Surprise Me!

कृषी कायद्या विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात,रावसाहेब दानवे|

2021-06-12 0 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत.केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे.पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय.फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला.या देशात आधी सिएए आणि एनआरसी मुळे उचकवण्यात आलं.पण यामुळे या एक मुस्लिम देशाबाहेर गेला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे असंही दानवे म्हणाले.

Buy Now on CodeCanyon